कामगार संघटनांनी आंदोलनाचा वीजपुरवठ्यावर परिणाम

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३० मार्च २०२२ | कामगार संघटनांनी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. धुळ्यात सुमारे पाच हजार कर्मचारी संपात किंवा आंदोलनात सहभागी झाले. तर जळगावात सुमारे साडेसात हजार कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. विविध मागण्यांसाठी वीज कंपनीचे कर्मचारी, कंत्राटी कामगार, औद्योगिक कामगार आणि अनेक बँकांचे कर्मचारी दोनदिवसीय देशव्यापी संपात उतरले आहेत.

जिल्ह्यातील सरासरी पाच ते सहा हजार कर्मचारी संपात उतरल्याने संबंधित कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला. शिवारातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. शेतकरी, ग्रामस्थांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे.
वीज कंपनी कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाविरोधात आंदोलन केले. आपल्याही मागण्या रेटण्यासाठी महसूल यंत्रणेने कर्मचारी स्वतंत्रपणे आंदोलनात सहभागी झाले.

परिणामी, महसूल कार्यालये, वीज कंपनीची कार्यालये, बँका, औद्योगिक प्रतिष्ठाने कर्मचारी, कामगारांअभावी ओस पडली. त्या ठिकाणी शुकशुकाट दिसला. अनेक बँकांचे व्यवहारही ठप्प झाले. महसूल विभागात महसूल सहायकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. कर्मचारी प्रचंड तणावात आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही भरतीकडे दुर्लक्ष केले जाते. यासर्व मागण्या मंत्रालयात दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment