खान्देश लाईव्ह | 3 नोव्हेंबर २०२२ |पती-पत्नीमध्ये जेवण मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीला कानात मारल्याने दुखापत केल्याची घटना जळगाव शहरातील कांचन नगरात घडली याबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील कांचन नगर भागात गणेश ठाकरे हे पत्नी पौर्णिमा ठाकरे यांच्या सोबत राहत असून . १३ ऑक्टोबर रात्री ११.३० वाजता गणेश ठाकरे यांनी जेवण मागितल्याच्या कारणावरून त्यांच्या पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादात रागाच्या भरात गणेश पुंडलिक ठाकरे यांनी पत्नी पौर्णिमा ठाकरे यांच्या कानावर मारून दुखापत केली. याबाबत विवाहितेने बुधवार २ नोव्हेंबर रोजी शनिपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती गणेश पुंडलिक ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत देशमुख पुढील तपास करीत आहे.