विद्युत वितरण कंपनीने ग्रामपंचायतीने थकित वीज बिल न भरल्याने खंडित केला वीज पुरवठा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १५ मार्च २०२२ | जळगावातील यावल तालुक्यात कोरपावली येथील ग्रामपंचायतीने थकीत विज बिल भरणा न केल्यास विद्युत वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे. परिणामी गेल्या दोन दिवसापासून स्टेट लाईट व सार्वजनिक पाणीपुरवठा होण्यास मोठी अडचण निर्माण झाल्याने करे कोण व भरे कोण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या दीड वर्षापासून स्टेट लाईट व पाणीपुरवठा यांचे वीज बिल जिल्हा परिषद मार्फत जात होती .ती रक्कम ग्रामपंचायतीने भरायची आहे. असून ती भरणा न केल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला. विद्युत बिलाची रक्कम ग्रामपंचायतीने भरावयाची होती अशा प्रकारचे निर्देश 15 वित्त आयोगाच्या निधीतून बराव्याचे आदेश संपूर्ण ग्रामपंचायतींना प्राप्त झाले होते. कोविड काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यात आले.

‘त्या’ कालावधीत ग्राम विकास अधिकारी व पंचायत समितीचे विस्ताराधिकारी ग्रामपंचायतीचे दैनंदिन व धोरणात्मक कामे हाताळत होते. ’ आता ग्रामपंचायत निवडणूक कार्यकाळ एक वर्ष पूर्ण झाले. तरीही संबंधित ग्रामपंचायतीने वीज पुरवठा थकबाकी रक्कम न भरल्याने वीज वितरण कंपनीच्या संबंधित अभियंता धांडे यांच्या आदेशाने पालन केले. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलु न गावाचा सार्वजनिक पाणी पुरवठा करणारा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment