चांदसर येथे दुचाकी लांबविली

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १६ नोव्हेंबर २०२२ | धरणगाव तालुक्यातील चांदसर येथून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी १५ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश भांडारकर (वय-५२) हे खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १० नोव्हेंबर रोजी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १४ बीएल १३७८) चांदसर शिवारात लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी २५ हजार किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अरूण निकुंभ करीत आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment