आकडा काढण्याच्या वादातून मारहाण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २२ डिसेंबर २०२२ Iतालुक्यातील निमखेडा येथे ईलेक्ट्रीक तारावरचा टाकलेला आकडा काढण्याच्या वादातून एका परिवाराला मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भारती दगडू पाटील यांच्यासोबत दीपक धैर्यसिंग राठोड, दिनेश नवल राठोड, नवल नामदेव पाटील, दिनेश ढेरेसिंग राठोड, अरुण किसन पाटील, पुरुषोत्तम गंगाधर पाटील (सर्व रा. निमखेडा ता. धरणगाव)ईलेक्ट्रीक तारावरचा टाकलेला आकडा काढण्यावरून वाद झाला. यातील सर्व संशयितांनी भारती पाटील यांच्यासह पती व मुलाला घरात घुसून मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल असून पुढील पो.हे.कॉ. राजेंद्र कोळी हे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment