खान्देश लाईव्ह | ४ नोव्हेंबर २०२२ | जामीन नामंजूर झाल्याच्या संतापात लोखंडी खिळा गिळून आत्महत्येचा प्रकार जिल्हा कारागृहातील कैद्याने केल्याची घटना ३ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. चेतन पितांबर सोनार (२६) असे या कैद्यांचे नाव आहे.
तुरुंग अधिकारी संतोष पोपटराव पवार यांच्या फिर्यादीनुसार चेतन सोनार या कैद्याने जामीन न्यायालयाने नामंजूर केल्याचे समजल्यानंतर जेलच्या बॅरेक भिंतीवरील खिळा गिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. कैद्यास तातडीने उपचारार्थ हलवण्यात आले तर या प्रकरणी चेतन सोनार याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा.निरीक्षक राजेंद्र पवार तपास करीत आहेत.