जसं पेराल, तसं उगवत – आ. गिरीश महाजन यांचा खडसेंना टोला

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 31 जुलै 2022 | भोसरी भूखंड प्रकरणात लोकनेते एकनाथ खडसे यांनी काय काम केले हे सर्व सामान्य जनतेला माहिती आहेतच. त्यामुळे त्यांना जावयासोबत तुरंगात जावे लागेल, असे भाजप आ. गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हास्तरीय बैठकीसाठी गिरीश महाजन हे जळगाव शहरात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली.

एकनाथ खडसेंनी खूपच चुकीची कामे केली

आ. गिरीश महाजन म्हणाले, मंत्री असताना खडसे यांनी अनेक चुकीची कामे केली. त्यामुळे ते इडीच्या सापड्यात आपले आहेत. आम्ही त्यांना तुरुंगात टाकतोय, असे म्हणणे चुकीचे आहे. स्वच्छ असाल तर चौकशीला सामोरे जावून कागदपत्रे सादर करा. यामध्ये कुणाचा हात, पाय असण्याचे काहीच कारण नाही.

भोसरी प्रकरणात गैरव्यवहार

तसेच, आ. गिरीश महाजन म्हणाले कि, भोसरी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी 13 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांना जामीन का मिळाला नाही? या प्रकरणात पूर्ण अनियमितता आहे. बोगस कंपनीकडून त्यांनी पैसे पुरविले. साडेतीन कोटी रुपये स्वत:च्या खात्यात आणले. अर्धे पैसे मंदाकिनी खडसे यांच्या नावावर आणले. अर्धी जमीन मंदाकिनी खडसे यांच्या नावावर केली. अर्धी जमीन जावयाच्या नावावर घेतली. साडेतीन कोटी रुपयांची दोघांमध्ये विभागणी केली. जमिनीची एकूण किंमत 30 कोटी रुपये असताना फक्त 3 कोटी रुपये दाखविली. अधिकारी या प्रकरणात तुरुंगात गेला आहे.

विकास दूध संघाबाबतच्या तक्रारींमध्ये तथ्य

विकास दूध संघात नोकरीला लावण्यासाठी गरीब शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबातील मुलांकडून खडसेंनी 20 ते 25 लाख रुपये आगाऊ घेतले, असा आरोप आ. गिरीश महाजन यांनी केला. महाजन म्हणाले, खडसेंविरोधात गंभीर स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे मला तरी वाटते. या तक्रारींची चौकशीसाठी समिती नेमण्यात आलेली आहे. जसं पेराल, तसं उगवते, असा टोलाही महाजन यांनी खडसेंना लगावला.

 

 

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment