गंभीर गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार रामजानेला अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 30 डिसेंबर २०२२ | अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अट्टल गुन्हे गराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रामजाने उर्फ राहुल पंढरीनाथ पाटील (वय-२५) रा. बंगाली फाईल, अमळनेर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

२० डिसेंबर मध्यरात्री साडेबारा वयाच्या सुमारास अमळनेर शहरातील रेल्वे स्टेशनवर सचिन पाटील (वय-22) राहणार शिवशक्ती चौक याला गुन्हेगार राहूल पाटील याने चाकूने वार करून मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच नंदुरबार रेल्वे पोलीस स्टेशनला जीवेठार मारण्याची धमकी आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. याला अमळनेर पोलिसांनी त्याच्या घराच्या परिसरातून अटक केली आहे. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोहेकॉ सुनील हटकर, किशोर पाटील, पोलीस नाईक रवींद्र पाटील, शरद पाटील, दीपक माळी आदींनी केली आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment