खान्देश लाईव्ह | २७ ऑक्टोबर २०२२ | शहरामधील महावीर नगरमधील एका घरातून अज्ञात चोरटयांनी दोन मोबाईल लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते ८.३० वाजे दरम्यान हॉटेल व्यवसायिक हेमंत शांताराम वाणी (वय-४८) यांच्या घरामधून ४५ हजाराचे दोन मोबाईल आज्ञात चोरट्याने चोरून नेले.याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल साहिल तडवी करीत आहे.