खान्देश लाईव्ह | १६ ऑक्टोबर २०२२ | गावाला जाणारी महिला एसटी बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधून १ लाख रुपये किमतीच्या सोनयाच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना येथे उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यात बहाद्दरपूर येथे राहणाऱ्या अरूणा शांताराम सुतार (वय-३६) या १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव येथून पारोळा येथे जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्स मधून १ लाख रूपये किंमतीच्या २५ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याचे लक्षात आल्याने अरुणा सुतार यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस करीत आहे.