एरंडोल महामार्गावर घडला भीषण अपघात; चार जण ठार, एक गंभीर जखमी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २४ फेब्रुवारी २०२२ | एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील महामार्गावर हा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

बुधवारी सायंकाळी हा अपघात घडला असुन परदेशी कुटुंबीय कारमधून एरंडोलकडून जळगावकडे जात होते. भरधाव कारने पिंपळकोठ्याजवळ रस्त्यालगत प्रवासी उतरवीत असलेल्या एम.एच १८ ए.ए.८८६७ क्रमाकांच्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील चालक चतरसिंग पदम सिंग परदेशी (वय ४०, तिघे रा. जामडी ता. चाळीसगाव) आणि आबा रामचंद्र पाटील (वय ५५, वडजी त‍ा. भडगाव) ,विजयसिंग हरी परदेशी (वय ६५), तुषार उर्फ जयदीप मदन सिंग परदेशी (वय ३७), अशी मृतांची नावे आहेत. तसंच रायसिंग पद्मसिंग राजपूत (वय ३७ रा. जामडी ता. चाळीसगाव) हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

चतरसिंग परदेशी, विजयसिंग परदेशी, जयदीप मदनसिंग परदेशी व आबा पाटील हे चौघाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रायसिंग पदमसिंग राजपूत हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. या ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. अपघातामुळे महामार्गावरील दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यावर एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील, अनिल पाटील आणि कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment