प.वि.पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक आकाशकंदील

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ ऑक्टोबर २०२२ | केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात दिवाळीचे औचित्य साधून आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली.

विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून सुंदर आणि आकर्षक असे आकाशकंदील या वेळी तयार केले. दिवाळी हा सण आपण मोठया उत्साहात साजरा करतो आणि त्या दिवशी आपण आपल्या घरी विविध प्रकारचे दिवे व आकाशकंदील लावूनआपले घर व अंगण सजवतो त्याचप्रमाणे आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेला सुद्धा आपण तसेच सजवले पाहिजे म्हणून असे आकर्षक आकाशकंदील तयार करून विद्यार्थ्यांनी शाळा अतिशय सुंदरतेची सजवली.

कार्यशाळा उपशिक्षक स्वाती पाटील अशोक चौधरी , कायनात सैय्यद ,दिपाली चौधरी , चारुलता भारंबे यांनी मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली तर सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment