खान्देश लाईव्ह | १९ ऑक्टोबर २०२२ | येथील रहिवासी असलेल्या ३१ वर्षीय महिलेला सासरच्या मंडळींनी २ लाख रुपये माहेरून आणावे, यासाठी छळ केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पाटीलगढी येथील रहिवासी असलेल्या ३१ वर्षीय महिला सोनल कैलास पारधी हिला नोकरी लावण्यासाठी तिच्या सासरचे मंडळी संशयित आरोपी कैलास रतिलाल पारधी, सासू – प्रमिलाबाई रतिलाल पारधी, जेठ भाऊसाहेब रतीलाल पारधी, जेठानी अनिताबाई पारधी, भैयासाहेब पारधी यांनी माहेरून २ लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. पैशांकरिता नकार दिल्याने तिला मारहाण व शिवीगाळ करीत घटस्फोट देण्याचीही धमकी सासरच्या मंडळीनी दिली आहे. याप्रकरणी महिलेने चोपडा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना.प्रमोद पाटील हे करीत आहेत.