नशिराबाद येथून ८ बकऱ्या चोरल्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ५ नोव्हेंबर २०२२ | अज्ञात चोरट्यांनी ३४ हजार रुपये किमतीच्या ८ बकऱ्यांची चोरीकेल्याची घटना तालुक्यातील नशिराबाद येथील ताज नगर येथे घडली असून याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख रईस शेख रशीद (वय 32, रा.ताज नगर नशिराबाद ता.जि. जळगाव) यांच्या ३ नोव्हेंबर रात्री ११ ते ४ नोव्हेंबर सकाळी ६ वाजेच्या दरम्यान ३४ हजार रुपये किमतीच्या ८ बकऱ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेकॉ मोहम्मद अफजल खान पुढील तपास करीत आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment