कारमधून ५३ किलो गांजा जप्त ; अमळनेर पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १९ नोव्हेंबर २०२२ | एका कारचा पाठलाग करीत आठ लाख रुपये किंमतीचा ५३ किलो गांजा जप्त केल्याची कारवाई अमळनेर पोलिसांनी केली असून चारचाकीसह दुचाकी वाहन जप्त केले. करावी करतांना गुन्हेगार पसार झाले. १७ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह सहकारी गुरुवार, १७ नोव्हेंबरच्या रात्री गस्त घालत असताना त्यांना एका चारचाकीतून गांजा तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पाठलाग करीत जळोद-अमळनेर रस्त्यावरून एका चारचाकीला अडवले. मात्र पोलिसांना पाहताच वाहन चालकाने वाहन सुसाट वेगाने पळवले. मात्र पोलिसांनी देखील वाहनाचा पाठलाग केला. एका खड्ड्यात वाहन आदळल्यानंतर चारचाकी वाहनातून संशयीत गुन्हेगार तौफिक शेख मुशिरोद्दीन (रा.गांधलीपुरा) हा असल्याची ओळख पटली. मात्र त्याच्यासह अन्य तीन अनोळखी आरोपी रात्रीच्या अंधारात पसार होण्यात यशस्वी झाले.डिक्कीतून तीन गोण्यांमधील आठ लाख दोन हजार ५०० रुपये किंमतीचा ५३ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. आरोपीनी सोडून दिलेली मोटरसायकल, कार व दोन मोबाईल असा एकूण १२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment