भवरखेडा येथून ३० हजारांची इलेक्ट्रिक मोटार लंपास

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । इलेक्ट्रिक दुकानासमोरून ३० हजार रुपये किमतीच्या चार ईलेक्ट्रीक मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना धरणगाव तालुक्यातील भवरखेडा गावातील बसस्थानकाजवळ घडली . याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि, , धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे स्वप्नील अधिकार पाटील (वय-३६) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मोटार रिवाइंडिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. यासाठी त्याचे गावातीलच बसस्थानक परिसरात दीपिका इलेक्ट्रिक नावाचे दुकान आहे. १४ डिसेंबर रात्री अडीच ते सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुकान दुकानासमोर ठेवलेल्या ३० हजार रुपये किमतीच्या ४ इलेक्ट्रिक मोटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या संदर्भात स्वप्निल पाटील यांनी चोरीची पूर्ण चौकशी केली असता, काहीही माहिती मिळाली नाही. अखेर २० दिवसानंतर ४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खुशाल पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment